मधुर भांडारकर दिग्दर्शित 'इंडिया लॉकडाऊन' या सिनेमात सई ताम्हणकर फुलमती बनून आपल्या भेटीस येत आहे. यातील तिच्या भूमिकेची अन् लूकची चर्चा कधीपासूनच रंगली आहे.
सई ताम्हणकर हे नाव आता मराठी पुरतं मर्यादीत राहिलेलं नाही तर सध्या सई बॉलीवूडही गाजवतेय.
सईनं सोशल मीडियावर आपल्या 'इंडिया लॉकडाऊन' सिनेमाचं पोस्टर शेअर केले आहे.
सईनं शेअर केलेल्या 'इंडिया लॉकडाऊन' या पोस्टरवर या सिनेमातील तिच्या भूमिकेचं नावही लिहिलं आहे.
सईचा पोस्टरवरील लूक पाहून हे फुलमती नाव तिला परफेक्ट सूट होतंय.
लॉकडाऊन दरम्यान अनेक मोलमजुरांना,गरिबांना जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. तोच या सिनेमातून मांडण्यात आला आहे.
मधुर भांडारकरच्या सिनेमात काम करण्याची संधी मिळणं म्हणजे सईला लागलेला मोठा जॅकपॉट म्हणावा लागेल.