केवळ मराठीतर नाहीतर आता हिंदी चित्रपट विश्वातही सईनं आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
बॉलीवूडमध्ये ज्या पुरस्काराला सर्वाधिक महत्व दिलं जातं त्या फिल्मफेअरची मानकरी सई ठरली आहे.
सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असणाऱ्या सईच्या मिमीला हा पुरस्कार मिळाला आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटावर प्रेक्षकांनी कौतूकाचा वर्षाव केला होता.
यंदाच्या फिल्मफेअरमध्ये सईला सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री म्हणूनचा पुरस्कार मिळाला आहे.
सई ही इंस्टावर आणि फेसबूकवर सर्वाधिक चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या बीई रोजगार नावाच्या मालिकेनं लक्ष वेधून घेतलं होतं.
मराठी मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रेटींनी सईचं मनापासून कौतूक करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
सई सध्या हास्यजत्रा नावाच्या मालिकेमध्ये जजच्या भूमिकेत असल्याचे दिसून आले आहे.
यावेळी फिल्मफेअरमध्ये सर्वाधिक चर्चेत होता तो शेरशहा आणि विकी कौशलचा सरदार उधम सिंग या चित्रपटांवर पुरस्कारांची बरसात झाली आहे.