अभिनेत्री कुब्रा खानवर सध्या हनी ट्रॅपचे आरोप होत आहे.
पाकिस्तानी माजी लष्करी अधिकारी आदिल रजा यांनी हे आरोप केलेत
रजा यांनी सांगितलं, की पाकिस्तानी लष्कर काही पाकिस्तानी अभिनेत्रींना हाताशी धरुन राजकीय लोकांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढत आहेच
या अभिनेत्रींमध्ये सजल अली, कुब्रा खान आणि मेहविश हयात यांची नावं पुढे येत आहेत
आदिल रजा यांनी थेट या अभिनेत्रींचं नाव घेतलं नसलं तरी शॉर्ट फॉर्म वापरला आहे
त्यानंतर नेटकरी या अभिनेत्रींना ट्रोल करु लागले
आता या अभिनेत्री पुढे येऊन बोलू लागल्या आहेत
अभिनेत्री कुब्रा खान हिने तर माजी लष्करी अधिकारी आदिल राज यांना थेट आव्हान दिलंय
आदिल राज यांनी तीन दिवसांमध्ये पुरावे सादर करावे, नसता त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा तिने दिला आहे
''मी सुरुवातीला शांत राहिले कारण एक खोटा व्हीडिओ माझ्या अस्तित्वाविषयी महत्त्वाचा ठरु शकत नाही. परंतु आता खूप झालं. कुणीही उठून आमच्याकडे बोट करेल, हे चालणार नाही''