Somi Ali on Salman Khan : बॉलिवूडचा दबंग सलमान खान अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. त्याच्या चाहत्यांची कमी नाही. सलमान खानची सर्वाधिक फॅन फॉलोइंग महिलांमध्ये आहे.
सलमान खान त्याच्या पर्सनल लाईफ आणि लव्ह लाईफमुळेही चर्चेत असतो. आता चर्चेत येण्याचे कारण म्हणजे सलमान खानवार त्याची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने गंभीर आरोप केले आहेत.
सोमी अलीची एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये ती तिला तिचे जुने दिवस आठवत असल्याचे सांगत आहे.
सोमी अलीने यापूर्वी देखील सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी तिने सलमानवर तिचा छळ केल्याचे म्हटले आहे.
यावेळी सोमीने तिच्या पोस्टची सुरुवात 'नो मोअर टीयर्स' या एनजीओने केली.
सोमी अली म्हणाली, तिने मानवी तस्करी आणि घरगुती हिंसाचार रोखण्यासाठी ही संस्था सुरु केली होती. पीडितांना वाचवण्यासाठी तिने 15 वर्षे काम केले.
सोमीने खुलासा केला की तिने नो मोअर टियर्स सुरू केले कारण ती स्वतः लहानपणी लैंगिक हिंसाचाराला बळी पडली होती. वयाच्या पाचव्या वर्षी आपले शारीरिक शोषण झाल्याचे तिने सांगितले.
यानंतर वयाच्या नऊव्या वर्षी पाकिस्तानात घरच्या मदतनीसाने तिचे शारीरिक शोषण केले. वयाच्या १४ व्या वर्षी अमेरिकेत तिच्यावर अत्याचार झाला.
यानंतर ती भारतात आली तेव्हा एका व्यक्तीने तिच्यावर घरगुती हिंसाचारही केला, ज्याला ती आठ वर्षे डेट करत होती, असे सोमी अलीमे म्हटले आहे.
मी मुंबईत असताना सलमान खान मला शिवीगाळ आणि मारहाण करायचा. सलमानने हे अनेक मुलींसोबत केले आहे, असा आरोप सोमी अलीने केला आहे.