संस्कृती बालगुडे हे मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेत असलेले नाव..
आजवर तिने अनेक चित्रपट, मालिका केल्या आहेत.
गेल्या काही वर्षात ती चित्रपटात झळकली नव्हती.
त्यामुळे ती कधी चित्रपटात दिसणार याकडे तिचे चाहते डोळे लावून होते.
अखेर संस्कृतीने आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
लवकरच तीचा 'चौक' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर संस्कृतीने शेयर केलं आहे.