Sara Ali Khan : सारा सासरी निघाली!

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान ही आता चांगलीच लोकप्रिय होताना दिसते आहे.

गेल्या काही दिवसांपासून साराच्या व्हायरल झालेल्या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आताही समुद्रकिनारी साराचा तो वधूच्या वेशभूषेतील फोटो चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे.

सारा अली ही तिच्या आगामी जरा हटके जरा बचके नावाच्या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसतेय.

त्या चित्रपटामध्ये तिच्यासोबत विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

आनंद एल राय यांच्या अतरंगी चित्रपटानंतर सारा ही हिट चित्रपटाच्या शोधात आहे.

अतरंगी रे मध्ये साराच्या अभिनयाचे आणि डान्सचे चाहत्यांनी प्रचंड कौतूक केले होते.

पुढील दिवसांत सारा बॉलीवूडच्या वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sara Ali Khan