Bazar Samiti Results : शड्डू ठोकत शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना इशारा

सकाळ डिजिटल टीम

प्रस्थापितांना धक्का

Shivendraraje Bhosale : राज्यात अनेक ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल लागले आहेत. या निवडणुकीत अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे.

काही नेत्यांनी गड राखले

तर काही नेत्यांनी आपले गड राखले आहेत. सातारा कृषी बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटानं बाजी मारलीये.

उदयनराजेंचा 'स्वाभिमानी'ला पाठिंबा

सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही खासदार उदयनराजेंनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा देऊन प्रतिष्ठेची केली होती.

शिवेंद्रराजेंवर भ्रष्टाचाराचे आरोप

या निवडणुकीत खासदार उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेऊन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

शिवेंद्रराजेंकडून एकहाती सत्ता काबिज

त्यानंतर काल या बाजार समितीचे निकाल लागले आणि ही बाजार समिती आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी एकहाती सत्ता मिळवत ताब्यात घेतली.

स्वाभिमानी संघटने दणदणीत पराभव

खासदार उदयनराजे भोसले आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचा दणदणीत पराभव करत 18-0 अशी बाजी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मारली.

शिवेंद्रराजेंनी मारला शड्डू

बाजार समितीच्या निवडणुकीत निघालेल्या मिरवणुकीत आमदार शिवेंद्रराजे यांनी दंड थोपटून आणि वेगवेगळ्या पोज देऊन विरोधकांना म्हणजेच, खासदार उदयनराजेंना एक प्रकारे इशारा दिला. (फोटो - प्रमोद इंगळे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Bazar Samiti Results