Satara : फोटोशूट, प्री-वेडिंगसाठी साताऱ्याची 'ही' ठिकाणं आहेत खास

| Sakal

Pre-wedding Photoshoot : लव्ह मॅरेज (Love Marriage) असो किंवा अँरेज मॅरेज (Arranged Marriage) गेल्या काही वर्षांमध्ये वधू-वर लग्नापूर्वी सुंदर आठवणींना कैद करण्यासाठी Pre-wedding Photoshoot करतात.

| Sakal

अलीकडं, प्री वेडींग फोटोशूटचा ट्रेंड आहे. लग्नाच्या पवित्र बंधनात अडकण्यापूर्वीचे सुंदर क्षण टिपण्यासाठी प्री वेडींग फोटोशूट एखाद्या खास ठिकाणी व्हावं, असं प्रत्येकाला वाटतं.

| Sakal

सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्या आणि निसर्गरम्य ठिकाणांनी संपन्न असलेल्या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथं तुम्ही प्री वेडींग फोटोशूट करू शकता.

| Sakal

महाबळेश्वर (Mahabaleshwar) - महाबळेश्वर हे प्रसिद्ध हिलस्टेशन आहे. जिथं तुम्ही प्री वेडींग फोटोशूट करू शकता. येथील अनेक पॉईंट, वेण्णा लेक तसंच हॉर्स रायडिंग करत फोटोशूटही तुम्ही करू शकता.

| Sakal

पाचगणी (Panchgani) - येथील निसर्गाच्या सानिध्यातील सुद्धा अनेक ठिकाणं आहेत. टेबललॅण्ड तसंच इतर ठिकाणीही तुम्हाला प्री वेडींग फोटो शूट करता येऊ शकतं.

| Sakal

कास पुष्प पठार (Kas Platue) - जगभरातील लोक कास पुष्प पठाराला भेट देण्यासाठी येत असतात. इथं फुलांच्या सानिध्यात प्री वेडींग शूट नक्कीच आकर्षक पद्धतीनं करता येईल.

| Sakal

ठोसेगर धबधबा (Thosegar Waterfall) - ठोसेघर धबधबा परिसरात अनेक ठिकाणं आहेत. जिथं तुम्ही प्री वेडींग फोटोशूट करू शकता.

| Sakal

वाई (Wai) - वाईतही अनेक हिंदी, मराठी चित्रपटांचं शुटिंग होत असतं. येथील कृष्णा नदीच्या घाटावर तुम्ही प्रीवेडींग करू शकता.

| Sakal

संगम माहुली (Sangam Mahuli) - इथं प्राचीन मंदिर आहे. या ठिकाणाचं पावित्र्य राखत तुम्ही जर पारंपारिक पद्धतीनं प्री वेडींग फोटोशूट केलं तर ते संस्मरणीय ठरणार आहे.

| Sakal

बामणोली (Bamnoli) - बामणोलीसारखं निसर्गरम्य ठिकाण त्यात बोटीमध्ये फिरताना फोटोशूट करणं एक वेगळा अनुभव ठरेल.

| Sakal

चाळकेवाडी (Chalakewadi) - चाळकेवाडीतील उंच पवणचक्क्यांच्या दरम्यान प्री वेडींग फोटोशूट करता येऊ शकतं. तेही एक खास ठिकाण आहे.

| Sakal