मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणजे सायली संजीव..
सध्या एकही चित्रपट असा नाही ज्यात सायली नाही..
नुकताच सायलीचा 'सातारचा सलमान' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
तर लवकरच ती 'फुलराणी' या चित्रपटात दिसणार आहे.
नुकत्याच एका सोहळ्या निमित्त सायलीने पैठणी नेसली होती.
पैठणी आणि सायली यांचं एक वेगळं नातं आहे.
कारण 'गोष्ट एका पैठणीची' या तिच्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.