संत्र खाण्याची दोन महत्वाची कारणं म्हणजे यामध्ये व्हिटामीन सी आणि फायबरचं भरपूर प्रमाण असतं. संत्र्यामुळे त्वचा देखील तजेल राहण्यास मदत होते.
स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटामीन सी आणि व्हिटामीन बी सर्वाधिक असते. शरीरातील साखरेचं प्रमाण समतोल राखण्यासाठी स्ट्रॉबेरीचा फायदा होतो.
अंजीर हे फळ पुरूषांसाठी अत्यंत महत्वाचे आहे. स्पर्म काऊंट वाढवण्यासाठी अंजीर खाणं फायद्याचं ठरेल. अंजीरातील कॅल्शिअम हाडांसाठी अत्यंत महत्वाचे आहे.
अननसातही व्हिटामीन सीचे प्रमाण सर्वाधिक आहे. या फळात दाहकपदार्थाला विरोध करण्याची क्षमता सर्वाधिक आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऍलर्जी झाल्यास त्याने अननसाचं सेवन करावं.
चिकू या फळात व्हिटामीन ए चे प्रमाण सर्वाधिक आहे. तात्काळ भूक शमवण्याचे काम चिकू करू शकते. चिकूमधून भरपूर ऊर्जा मिळते यामुळे प्रवासात अगदी सहजपणे कॅरी करू शकतो.
मोसंबीत सर्वाधिक फायबर असते जे शरीराला महत्वाचे असते. मोसंबीने श्वसनाचा त्रास कमी होतं. तसेच सूज कमी करण्यासाठी देखील गुणकरी आहे.
कोलेस्ट्रॉलचं प्रमाण संतुलित राखण्यासाठी स्टारफ्रूट या फळाची खूप मदत होते. या फळामुळे शरीरात चरबीची पेशी तयार होण्यास प्रतिबंध निर्माण होते.
थंड वातावरणात तुमच्या शरीरातील उष्णता सांभाळून ठेवण्यासाठी पपईचा खूप फायदा होतो. थंडीशी दोन हात करण्यासाठी पपई जरूर खावा.