शाहीनने शाहिद आफ्रिदीच्या मुलीशी केले लग्न!

| Sakal

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी शुक्रवारी विवाहबद्ध झाला.

| Sakal

त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशासोबत लग्न केले.

| Sakal

कराची शहरात निकाह सोहळा पार पडला.

| Sakal

यादरम्यान पाकिस्तानचा माजी कर्णधार सर्फराज अहमदपासून ते सध्याचा कर्णधार बाबर आझम तेथे पोहोचला.

| Sakal

शाहिद आफ्रिदीने 2021 मध्येच पुष्टी केली की शाहीनला त्याच्या दुसऱ्या मोठ्या मुलीशी लग्न करायचे आहे.

| Sakal

मात्र त्यांच्या लग्नाला बराच विलंब झाला. आफ्रिदीची इच्छा होती की त्याच्या मुलीने आधी तिचे शिक्षण पूर्ण करावे.

| Sakal

टी-२० विश्वचषकानंतर दुखापतीमुळे संघाबाहेर पडलेल्या शाहीनची प्रतीक्षा अखेर संपली आहे.

| Sakal

आता त्याने अंशासोबत लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर सासरा शाहिद आफ्रिदी आणि शाहीन एकत्र दिसले.

| Sakal

नसीम शाह, शादाब खान, मोहम्मद हाफीज यांनीही शाहीनच्या लग्नाला हजेरी लावली होती.

| Sakal