शिल्पा शेट्टी ही बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचा चाहतावर्ग मोठा आहे.
बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं चाहत्यांना खूश करणारी अभिनेत्री म्हणून शिल्पानं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिल्पा वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.
शिल्पाचा पती राज कुंद्रा याच्यावरील एका केसमुळे अडचणीत सापडला होता. त्यावरुन शिल्पाला ट्रोल करण्यात आले होते.
वेगवेगळ्या रियॅलिटी शोमध्ये शिल्पा नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते.
शिल्पाचा काही दिवसांपूर्वी एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र तो काही चालला नाही.
येत्या काळात शिल्पा ओटीटीतून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
शिल्पा ही फिटनेस फ्रीक म्हणूनही चाहत्यांच्या चर्चेचा विषय असते.