शिल्पा म्हणतेय,'लग्न नकोच,सिंगलच बरी'

| Sakal

शिल्पा शिंदेला कोणत्याही स्वतंत्र ओळखीची गरज नाही. तिनं अंगूरी भाभी बनून सर्वांना आपलसं केलंच आहेच, आता ती 'झलक दिखला जा १०' मध्ये एन्ट्री करुन आपल्या ठुमक्यानं सगळ्यांना वेड लावणार हे नक्की.

| Sakal

शिल्पा याआधी 'बिग बॉस ११' या रिअॅलिटी शो मध्ये देखील सहभागी झाली होती. स्टॅंडअप कॉमेडी शो 'गॅंग्ज ऑफ फिल्मिस्तान' मध्ये देखील ती दिसली होती. त्यामुळे रिअॅलिटी शो ची ती 'क्वीन' आहे असं म्हणायला हरकत नाही. 'झलक..' करताना याचा तिला नक्कीच फायदा होईल.

| Sakal

शिल्पा ४४ वर्षांची असून तिनं अजून लग्न केलेलं नाही. तिला लग्न करायचं नाही,सिंगलच बरी असं देखील ती अनेकदा म्हणाली आहे. पण यामागे देखील एक कारण आहे.

| Sakal

खूप वर्षांपूर्वी शिल्पानं रोमित राजशी साखरपुडा केला होता. पण गोष्ट लग्नापर्यंत पोहोचलीच नाही. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती की,ती रिलेशनशीपमध्ये नाही याचं तिला दुःख नाही. आपल्याला जोडीदाराची गरज नाही.

| Sakal

रोमित राजसोबत जेव्हा साखरपुडा झालेला तेव्हा ती खूप लहान होती,आणि तिला तेव्हा लग्न करायचं नव्हतं. पण जवळच्या लोकांचे म्हणणे होते हेच योग्य वय लग्न करायचं म्हणून आपण तयार झालो होतो असं शिल्पा म्हणाली होती. पुढे रोमित आणि तिच्यात बिनसलं व ते वेगळे झाले. पण त्यानं आपण तुटूनही गेलो होतो असं तिनं सांगितलं.

| Sakal

त्या वाईट अनुभवनातंर शिल्पानं पक्का निश्चय केला की नात्यांपासून लांब राहायचं. शिल्पा म्हणाली,''मी जेव्हा स्वतः अनुभवलं की मी सिंगल खूश आहे. त्यानंतर लग्नाचं दार मी माझ्यासाठी बंद करुन टाकलं''.

| Sakal

शिल्पा लवकरच 'झलक दिखला जा १०' मध्ये दिसणार आहे. तिचा शो संबंधित एक प्रोमो सध्या भलताच पसंत केला जातोय. शिल्पानं इन्स्टावर नुकतेच ब्लॅक रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो देखील पोस्ट केले आहेत,ज्यावर चाहत्यांच्या फायर इमोजीचा आणि कमेंट्सचा वर्षाव झालेला दिसत आहे.

| Sakal