अखेर श्रेयसचं स्वप्न साकार...

| Sakal

गेली अनेक वर्ष श्रेयस तळपदे मनोरंजनसृष्टीत काम करतोय. मालिका,नाटक,मराठी सिनेमे मग हिंदी सिनेमे अशी त्याची घोडदौड सुरूच आहे.

| Sakal

सध्या श्रेयस भलताच खूश आहे. त्यानं जाहिरपणे म्हटलं आहे की,'अखेर स्वप्न पूर्ण झालं'. आता नेमकं कशाविषयी बोलतोय श्रेयस तळपदे? चला,जाणून घेऊया.

| Sakal

श्रेयस तळपदे पारितोष पेंटर लिखित 'तो मी नव्हेच' सिनेमात काम करतोय. पण यात तो 'रंगीला गर्ल' उर्मिला मातोंडकरसोबत दिसणार आहे. आणि हीच ती खास गोष्ट.

| Sakal

याविषयी बोलताना स्वतः श्रेयस म्हणाला,''त्या काळी 'रंगीला' मधील 'या ही रे' या गाण्यातील उर्मिलानं सर्वांना घायाळ केलं होतं. त्याच उर्मिलासोबत स्क्रीन शेअर करेन असं वाटलं नव्हतं''.

| Sakal

पुढे श्रेयस म्हणाला,''परितोषनं ही किमया साधली आहे. योगायोग म्हणजे आम्ही दोघेही मिठीबाई कॅालेजचे विद्यार्थी आहोत''.

| Sakal

श्रेयस म्हणाला, ''उर्मिलासोबत काम करण्याची संधी मिळाल्यान मी खूप आनंदी आहे''.

| Sakal

आता चाहतेही उत्सुक आहेत श्रेयस तळपदे आणि उर्मिला मातोंडकरची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पडद्यावर अनुभवण्यासाठी.

| Sakal