Shriya Saran: वेस्ट इंडिजच्या खेळाडूसोबत डेटिंग, रशियन टेनिसपटूशी लग्न!

| Sakal

मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री श्रिया सरननं टॉलीवूड, बॉलीवूडमधील अनेक कलाकारांसोबत काम केले आहे. रजनीकांत पासून अजय देवगणपर्यत अशी ती मोठी यादी आहे.

| Sakal

आज श्रियाचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्तानं चाहत्यांनी आपल्या आवडत्या अभिनेत्रीला सोशल मीडियावरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

| Sakal

कोणेएकेकाळी वेस्ट इंडिजच्या क्रिकेटरसोबत श्रियाचं नाव जोडलं गेलं होतं. त्यानंतर तिंनं रशियन खेळाडूशी संसार थाटला.

| Sakal

टॉलीवूडमध्ये आपल्या नावाची वेगळी ओळख श्रियानं तयार केली आहे. ती एक नावाजलेली अभिनेत्री आहे. बऱ्याचदा बोल्ड अदांमुळे श्रिया चर्चेतही आली आहे.

| Sakal

चिंरजीवी, नागार्जुन, प्रभास, रजनीकांत यांच्यासारख्या सेलिब्रेटींसोबत तिनं भूमिका केल्या आहेत. त्यात अजय देवगणच्या दृष्यममध्येही ती चमकली होती.

| Sakal

श्रिया ही केवळ चांगली अभिनेत्री नाहीतर उत्तम डान्सरही आहे. तिनं 2003 मध्ये आलेल्या तुझी मेरी कसममध्ये काम केलं होतं.

| Sakal

उत्तर प्रदेशातील हरिद्वारमध्ये जन्म झालेल्या श्रियाचा चाहतावर्ग मोठा आहे. श्रियानं दिल्लीतून आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर बॉलीवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

| Sakal

श्रियानं रशियन बॉयफ्रेंड आंद्रेई कोशेचव सोबत 2018 मध्ये लग्न केलं. आंद्रेई हा बार्सिलोनाचा टेनिस खेळाडू असून त्यांच्या जोडीला प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळाली आहे.

| Sakal