टिव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी नेहमी तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत येत असते.
पण सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
ते म्हणजे तिचं तिसरं लग्न. तिच्या लग्नाच्या काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.
या फोटोमध्ये ती नवरीसारखी नटलेली दिसत आहे.
पण हे तिचं खरं आयुष्यातील लग्नाचे फोटो नव्हे.
'डॅड की दुल्हन' मालिकेत ती वरुण बडोलासोबत लग्न करणार आहे.
या मालिकेतील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
श्वेताने खऱ्या आयुष्यात दोनदा लग्न केले. पहिलं लग्न तिने राजा चौधरीसोबत केलं होतं. पलक ही त्यांचीच मुलगी आहे. लग्नाच्या १४ वर्षांनी त्यांनी घटस्फोट घेतला
तर दुसरं लग्न तिने अभिनव कोहलीसोबत केले. एका बाळाला जन्म दिल्यानंतर ती अभिनवपासून वेगळी झाली
४२ वर्षीय श्वेता सध्या सिंगल आहे. तरुण अभिनेत्रींनाही मागे टाकेल इतकी ती सुंदर आणि हॉट दिसते.