बॉलीवूडचं प्रसिद्ध जोडपं अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी हे लग्नबंधनात अडकले आहेत
गेल्या बऱ्याच दिवसांपासून या दोन्ही सेलिब्रेटींच्या लग्नाची चर्चा होती. अखेर ते विवाहबंधनात अडकले
लग्नाचे कोणतेही फोटो बाहेर जाणार नाहीत किंवा ते सोशल मीडियावर प्रसिद्ध होणार नाहीत याची काळजी सिद्धार्थ आणि कियारानं घेतली होती.
सकाळपासून त्यांच्या लग्नाची वाट पाहणाऱ्या चाहत्यांना अखेर दिलासा मिळाला आहे.
नुकतंच काही वेळापूर्वी सिद्धार्थ आणि कियारा यांनी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत
अविस्मरणीय क्षणासाठी या बॉलिवूड स्टार्सनी राजस्थानमधील जैसलमेरची निवड केली होती.
कियारा आणि सिद्धार्थ 7 फेब्रुवारीला संध्याकाळी जैसलमेरची शान असलेल्या सूर्यगढ हॉटेलमध्ये त्यांचे लग्न झाले
लग्नासाठी या स्टार्सनी सूर्यगढ पॅलेसच्या 80 रूम्स बुक केल्या होत्या. डेस्टिनेशन वेडिंगसाठी या पॅलेसचे भाडे 1 कोटी 20 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
एका खोलीचे भाडे दोन लाख रुपयांपर्यंत आहे. रॉयल रूमबद्दल बोलायचे झाले तर त्याचे भाडे एक कोटी रुपयांपर्यंत आहे.