सध्या ऱ्हदयाशी संबंधीत समस्या सातत्याने समोर येत आहेत. आणि त्यामुळे अनेकांचा मृत्यू देखील होत आहे.
ऱ्हदय कमकुवत असल्याचे अनेक प्रकारची लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे वेळीच ओळखली तर त्यावर उपचार देखील शक्य होतात.
आज आपण या सर्व लक्षणांबद्दल जाणून घेणार आहोत जे तुमचं ऱ्हदय कमकुवत असल्याचे दर्शवतात.
दीर्घकाळापर्यंत छातीत जळजळ हे कमकुवत ऱ्हदयाचे लक्षण असू शकते.
खूप दिवसांपासून श्वास घेताना त्रास होत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका.
अस्वस्थ वाटण्यासोबतच तुमच्या छातीत दाव जाणवत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
घोरण्याच्या सवयीचा देखील थेट ऱ्हदय कमकुवत असण्याशी संबंध असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
ऱ्हदय कमकुवत असल्यास रक्तदाब अनियंत्रित होतो आणि उच्च रक्तदाबामुळे ऱ्हदयविकाराचा धोका वाढू शकतो.
ही बातमी समान्य माहितीवर आधारित आहे. कोणत्याही विशिष्ट माहितीसाठी योग्या तज्ञांचा सल्ला घ्या.