Smriti Irani : 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' टीमसोबत स्मृती इराणींचं फोटो सेशन

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींची मुलगी शानेल इराणीनं कॅनडास्थित वकील अर्जुन भल्ला यांच्याशी जोधपूरजवळील खिस्मार किल्ल्यावर नुकताच विवाह केला.

अभिनेत्री आणि मंत्री स्मृती इराणींची मुलगी शानेल इराणीची नुकतीच रिसेप्शन पार्टी झाली. या पार्टीत शाहरुख खान आणि मौनी रॉयसह अनेक स्टार्स सहभागी झाले होते.

फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता अभिनेत्री मौनी रॉय पती सूरज नांबियारसोबत पार्टीत पोहोचलीये.

शानेलच्या रिसेप्शन पार्टीत बॉलिवूडचा किंग शाहरुख खानही या सेलिब्रेशनमध्ये सामील झाला होता.

मौनी टीव्ही शो 'क्यूंकी सास भी कभी बहू थी'चा एक भाग आहे. फोटोंत ती स्मृती इराणींच्या अगदी जवळ दिसत आहे.

शानेलच्या या रिसेप्शन पार्टीत रवी किशन आणि रोनित रॉय देखील सहभागी झाले होते. रोनित रॉय आणि स्मृती इराणींनी 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' या चित्रपटात काम केलंय.

एवढंच नाही तर स्मृती इराणींची खास मैत्रीण आणि निर्माती एकता कपूरही तिचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांच्यासोबत रिसेप्शनला पोहोचलीये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shanelle Arjun Reception Party