सोलापूर शहर हा एकूण सोळा गावानी मिळून बनलेला आहे. म्हणून त्या जिल्ह्याला सोलापूर हे नाव पडलेले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर देशातील प्रमुख तीर्थ क्षेत्रापैकी एक क्षेत्र आहे. महाराष्ट्रातील दैवत विठ्ठल रुख्माईच्या या मंदिरात आषाढी व कार्तिकी एकादशीला लाखो लोक दर्शनाला येतात.
उजनी येथे भीमा नदीवर धरण बांधण्यात आले आहे. हा धरणाचा परिसर अतिशय सुंदर आहे.
माळढोक पक्षी अभयारण्य विशेष आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे. येथे अनेक पर्यटक येतात.
सोलापूरची चादर देशभरात प्रसिद्ध आहे. विदेशातूनही या चादरीला विशेष मागणी आहे.
सोलापूरची शेंगदाण्याची चटणी संपूर्ण देशात फेमस आहे.
सोलापूरात आला आणि गुळ पोळी खाल्ली नाही तर काय मजा.. त्यामुळे सोलापूरातील गुळपोळी एकदा तरी चाखावी.
सोलापूरच्या कडक भाकरीही प्रसिद्ध आहे. या भाकरी तुम्ही एकदा घेतल्या किंवा बनवल्या की जवळपास एक महिना खाऊ शकता.
सोलापूरातील सिद्धेश्वर यात्राही तितकीच फेमस आहे. या यात्रेत लाखो भाविक सहभागी होतात.
सोलापूरची भाषा आणि येथील सोलापूरही लोकही तितकेच गोड आहे. त्यांची भाषा ऐकून तुम्हीही सोलापूरच्या प्रेमात पडाल.