Sonalee Kulkarni: महाराष्ट्राची ‘अप्सरा’ सोनालीचा नवा लूक

| Sakal

महाराष्ट्राची ‘अप्सरा’ आणि ‘पांडू’ फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखले जाते.

| Sakal

सोनालीने तिच्या अभिनयातून आणि नृत्याच्या अदाकारीतून मराठी चित्रपटसृष्टीत तिचा एक वेगळाच ठसा उमटवला आहे.

| Sakal

सोनालीचा अभिनय, फिटनेस आणि बहारदार नृत्यकला यामुळे ती नेहमीच चाहत्यांच्या मनाचा ठाव घेते.

| Sakal

सोशल मीडियावर सोनाली नेहमीच सक्रिय असल्याचे पहायला मिळते. विविध लूक्समधील फोटो आणि आगामी प्रोजेक्टसच्या पोस्ट ती नेहमी शेअर करताना दिसते.

| Sakal

सोनाली कुलकर्णी ही अभिनेत्री नृत्यांगना म्हणून जरी सिनेसृष्टीत आली असली तरी हळूहळू तिने तिची इमेज बदलून वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट दिले.

| Sakal

आपलं व्यक्तिगत आयुष्य आनंदाने जगतानाच सोनालीने आपली कारकिर्दही तितकीच बहारदार बनवली आहे.

| Sakal

सोनालीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन नुकताच एक नवा लूक शेअर केलाय ज्यात ती लाल रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे.

| Sakal

सोनालीने हा लूक पूर्ण करण्यासाठी ब्राईट मेकअप केला आहे. त्याचबरोबर केस वेगळ्या स्टाईलमध्ये बांधले आहेत.

| Sakal

सोनाली कुलकर्णी सध्या पुष्कर जोगसोबत तिच्या आगामी हॉरर थ्रिलर चित्रपटावर काम करत आहे.

| Sakal

सोनाली सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. आपले क्लासी आणि हटके फोटो ती नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते.

| Sakal