अनेक दिवसांपासून सोनाली कुलकर्णीच्या 'मोगलमर्दिनी ताराराणी' सिनेमाची उत्सुकता होती.
अखेर सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्या 'मोगलमर्दिनी ताराराणी' सिनेमाचा टिझर रिलीज झालाय.
अंगांवर रोमांच उभा करणारा आणि प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा असा हा टिझर आहे.
असामान्य शौर्य दाखवणाऱ्या, रणांगण गाजवणाऱ्या, आक्रमक राजकारणी छत्रपती ताराराणी यांची ही कथा आहे.
मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याचे हे विलक्षण पर्व आहे.
जिथे एक युगप्रवर्तक सासऱ्याचे, पराक्रमी पित्याचे, कुशल राजकारणी अशा पतीचे आणि शूर, गुरुसमान दिराचे छत्र हरवलेली तडफदार स्त्री औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूविरुद्ध विजय मिळवते.
स्वराज्याच्या तिन्ही छत्रपतींचे छत्र हरवल्यानंतर दुःख बाजूला ठेवून आपल्या कर्तुत्वाने मराठेशाही सांभाळणाऱ्या महाराणी ताराबाई राजाराम भोसले यांची ही शौर्यगाथा लवकरच प्रदर्शित होणार आहे.