सोनाली कुलकर्णी आजकाल सोशल मीडियावर सक्रिय पहायला मिळते.
सोनालीनं संक्रातीच्या निमित्तानं काही खास फोटो शेअर केले आहेत.
काळ्या रंगाच्या बॅकड्रॉपवर तिनं शेअर केलेल्या फोटोना तिनं खास कॅप्शन दिलं आहे.
सोनालीनं आपले फोटो शेअर करत लिहिलं आहे,'हा खेळ सावल्यांचा..'
त्या फोटोंमध्ये सोनालीनं दिलेल्या प्रत्येक पोझमध्ये तिच्यासोबत तिची सावलीही तितकीच आकर्षक दिसतेय.
सोनालीचं 'व्हाईट लिली अॅन्ड नाइट रायडर' हे नाटक पुन्हा आपल्या भेटीस आलं आहे.
सोनाली आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही सक्रिय झाली आहे. अन् वेबसिरीजमधील तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरताना दिसत आहेत.