आंबट दही वापरायच्या लायकीचं नसतं असा बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे. मात्र तुम्हाला माहितीये काय, याचा दुसऱ्या पद्धतीनेसुद्धा वापर करता येतो.
भटूऱ्याची कणीक मळताना तुम्ही त्यात हे दही घालून कणीक मळू शकता. त्याने भटूरे सॉफ्टही होतात आणि फुलतातही.
ढोकळ्याच्या बॅटरमध्येही तुम्ही हे आंबट दही घालू शकता. याने ढोकळा फक्त फुलणारच नाही तर त्याची टेस्टही चटपटीत होईल.
आंबट दह्याने तुम्ही स्वादिष्ट चटणीही बनवू शकता. लसूण आणि मिर्चीची पेस्ट बनवताना त्यात स्वादानुसार मीठ टाका.
डोसा बॅटर बनवण्यासाठी तांदूळ धुतल्यानंतक त्यात आंबट दही मिक्स करा. यात मेथीचे दाणेही मिक्स करा.
बेसन आणि चिला बनवण्यासाठी आंबट दह्याचा वापर करता येतो.
दही जास्त आंबट झाल्यास त्याला फेकून देऊ नका त्याची कढी बनवा.
दही आलूची चटपटीत रेसिपी एकदा बनवून बघा. फार टेस्टी अशी ही रेसिपी आहे.