सावधान! जेवणानंतर तुम्हीही चहा पिता ही सवय आत्ताच सोडा

| Sakal

चहा अनेक लोकांचे आवडते पेय आहे. अनेक लोकांच्या दिवसाची सुरुवातच चहाने होते. लोक एकवेळ जेवणाची वेळ चुकवतील पण चहाची वेळ कधीच चुकत नाही.

| Sakal

चहा प्यायल्याने आनंद मिळतो, परंतु तो पिण्याची वेळ आणि प्रमाण योग्य असावं. काही लोक जेवणानंतरही चहा पित असतात. परंतु असं करणे शरीरासाठी हानिकारक ठरु शकते.

| Sakal

जेवण केल्यानंतर चहा प्यायल्याने पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो.

| Sakal

चहामध्ये असलेल्या कॅफीनमुळे शरीरावर वाईट परिणाम होतात.

| Sakal

जेवणानंतर लगेच चहा प्यायल्याने उच्च रक्तदाबाचं कारण बनू शकते. जर तुम्ही आधीपासूनच उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर तुम्ही जेवणानंतर लगेच चहा पिणे टाळायला हवे.

| Sakal

रोज दुपारी आणि रात्री जेवणानंतर चहा प्यायल्याने हृदयाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.

| Sakal

पित्त, कफ इ. समस्याही निर्माण होऊ शकतात. जेवणानंतर लगेच चहा प्यायल्याने शरीर आवश्यक पोषणतत्व अवशोषित करू शकत नाही.

| Sakal

तसं पाहिलं तर अनेक लोक चहाचे सेवन डोकेदुखी दूर करण्यासाठी करतात. पण त्यामुळे शरीरातील अॅसिडची मात्रा वाढते आणि डोकं दुखू लागतं. चहामध्ये फेनोलिक नामक तत्त्व आढळते. त्यामुळे शरीराला लोह शोषित करायला अडचण येऊ शकते.

| Sakal