स्वरा भास्करला बॉलीवूडमध्ये १२ वर्षाहून अधिक काळ झाला आहे. 'तनु वेड्स मनू','रांझणा','वीरे दी वेडिंग' सारख्या सिनेमात काम करुन तिनं बॉलीवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे.
नेपोटिझमच्या विरोधात ती आवाज उठवताना दिसली. इतकंच नाही तर बॉलीवूड सोबतच राजकीय,सामाजिक मुद्द्यांवरही ती वादग्रस्त कमेंट करुन चर्चेत आली आहे.
स्वरानं अनेक वर्षांनी आता खुलासा करत म्हटलं आहे की, ती पहिल्यांदा मुंबईत आल्यावर तिला कोणी भाड्यानं घर द्यायला देखील तयार नव्हतं. सर्वजण आपल्याकडे वाया गेलेली मुलगी म्हणूनच पहायचे.
घरातून निघताना स्वरानं थोड्या गरजेच्या वस्तू सोबत आणल्या होत्या पण राहण्यास घर मिळत नसल्याने शेवटी एक महिना ती आपल्या एका मैत्रिणीसोबत राहिली होती.
स्वरा भास्कर म्हणाली की, ती काही दिवस गोरेगावच्या एका इमारतीत वन बेड आणि किचन च्या घरात ६-७ जणांसोबतही राहिलीय.
काही दिवस एका ऑफिसात राहत असताना सकाळी ९ च्या आत ते खाली करायला लागायचं तर संध्याकाळी ६ नंतर तिथे एन्ट्री मिळायची असं देखील स्वरा म्हणाली.
घरातून काम शोधायला बाहेर पडलं की पाणी उपसलं म्हणून घरमालक नको-नको ते बोललेलं मी ऐकलंय असा खुलासाही स्वरानं केला आहे.
मुंबईत येताना आईनं बेडिंग रोल,कुकर,मोठी पेटी भरून सामान दिलं होतं. माझ्या आईला माहित होतं मी कधी लग्न करणार नाही म्हणूनच तिनं ते केलं असावं बहुधा,असं हसत हसत स्वरा म्हणाली.