नीलेश अडसूळ
बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्करने काही दिवसांपूर्वीच आपला बॉयफ्रेंड फहाद अहमद सोबत कोर्ट मॅरेज केलं होतं.
कोर्ट मॅरेज केल्यानंतर अभिनेत्रीनं अगदी पारंपरिक हिंदू पद्धतीनं लग्न केलं.
त्यानंतर स्वराने तिच्या निकटवर्तीयांसाठी खास रिसेप्शन आयोजित केलं होतं.
दिल्लीमध्ये अत्यंत दिमाखदारपणे हा सोहळा पार पडला.
या सोहळ्याला अनेक बडे राजकीय नेते आवर्जून उपस्थित होते.
यावेळी स्वरा आणि फहादच्या आकर्षक लुकने सर्वांनाच भुरळ घातली.
स्वरा बॉलीवुड मधली प्रसिद्ध अभिनेत्री आहे तर फहाद सामाजिक चळवळी आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.