T20 World Cup : गोलंदाजीत अव्वल 'आशिया' भारताच्या पदरी निराशा

| Sakal

शाकिब - अल - हसन (2007 पासून अजून खेळतोय) :

शाकिब - अल - हसन हा 8 टी 20 वर्ल्डकप खेळणारा दुसरा खेळाडू आहे. याचबरोबर त्याने टी 20 वर्ल्डकप इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वाधिक 47 विकेट्स घेतल्या आहेत.

| Sakal

शाहिद आफ्रिदी (2007 ते 2016) :

टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा शाहिक आफ्रिदी आहे. त्याने 23.25 च्या सरासरीने 39 विकेट्स घेतल्या आहेत.

| Sakal

लसिथ मलिंगा (2007 - 2014) :

टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत आशियाचा दबदबा आहे. या यादीत तिसऱ्या स्थानावर श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आहे. त्याने 7.43 च्या सरासरीने 38 विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंडविरूद्ध त्याने 31 धावात 5 विकेट्स घेतल्या होत्या.

| Sakal

सईद अजमल (2009 ते 2014) :

पाकिस्तानच्या सईद अजमलने टी 20 वर्ल्डकपमध्ये 16.86 च्या सरासरीने 36 विकेट्स घेतल्या आहेत. तो या यादीत चौथ्या स्थानावर आहे.

| Sakal

अजंता मेंडिस (2009 ते 2014) :

टी 20 वर्ल्डकप इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत पाचवा क्रमांक श्रीलंकेच्या अजंता मेंडिसचा लागतो. त्याने 2009 ते 2014 या कालावधीत झालेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये 35 विकेट्स घेतल्या.

| Sakal

टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत पहिल्या पाच खेळाडूंमध्ये आशियातील संघांचे वर्चस्व आहे. मात्र यात एकाही भारतीय गोलंदाजाचा समावेश नाही.

| Sakal