१ ऑगस्ट १९८७ रोजी तिचा जन्म झाला असून सध्या ती ३५ वर्षांची आहे.
सिनेमांमध्ये केवळ शोभेची बाहुली म्हणून मिरवण्यापासून तापसीनं स्वतःला कायमच दूर ठेवलं आहे.
निवडक सिनेमांमधूनच तिनं आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
सिनेक्षेत्रातील एक सक्षम महिला अभिनेत्री म्हणून तिच्याकडं पाहिलं जातं.
पिंक, थप्पड, बदला हे सिनेमे केवळ तापसीच्या नावानं ओळखले जातात.
२०१० मध्ये एका तेलगू सिनेमातून तिचं भारतीय सिनेसृष्टीत पदार्पण झालं.
त्यानंतर २०१३ मध्ये चष्मे बद्दूर चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये झळकली.