बॉलिवूडची अतिशय सुंदर अभिनेत्री तबस्सुम फातिमा हाश्मी उर्फ तब्बूला कोण ओळखत नाही.
तब्बूने 'हम नौजवान' या चित्रपटातून बालकलाकार म्हणून फिल्मी करिअरला सुरुवात केली.
90 च्या दशकापासून आतापर्यंत तब्बूने आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर लोकांना वेड लावले आहे.
अभिनेत्री तब्बू ही शबाना आझमीची भाची आणि फराह नाजची बहीण आहे.
यानंतर तब्बूने पहिल्यांदा बोनी कपूरचा 'प्रेम' हा चित्रपट मुख्य अभिनेत्री म्हणून साईन केला.
यानंतर तिने 'माचीस', 'कालापानी', 'अस्तित्व', 'चांदनी बार', 'मकबूल', 'हैदर' यांसारख्या अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये प्रशंसनीय भूमिका साकारल्या.
तब्बूने केवळ हिंदीतच नव्हे तर, इंग्रजी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, मराठी आणि बंगाली भाषांमध्येही काम केले आहे.
तब्बूच्या आयुष्यातील पहिले अफेअर अभिनेता संजय कपूरसोबत होते.
त्यानंतर, दिग्दर्शक/निर्माता साजिद नाडियाडवाला यांनी तब्बूच्या आयुष्यात प्रवेश केला.
तब्बूचं तिसरं अफेअर साऊथचा स्टार अक्किनेनी नागार्जुनसोबत होते.
तब्बू आणि नागार्जुनचे अफेअर 10 वर्षांहून अधिक काळ होते.