हिवाळ्यात प्रवासादरम्यान आजारपण दूर ठेवण्यासाठी अशी घ्या काळजी

| Sakal

आपण चालण्याचा जितका जास्त व्यायाम करू तितके आपण ऍक्टिव्ह राहतो. आपली सहनशक्ती त्याचप्रमाणे स्टॅमिनाही वाढतो.

| Sakal

प्रवास कोणत्याही वाहनाने केला, तरी तुमचं शरीर फिट असेल, तर वातावरण, थकवा या गोष्टींचा परिणाम तुमच्या शरीरावर होत नाही.

| Sakal

प्रवासादरम्यान शक्यतो मांसाहार टाळावा. भोजनात प्रामुख्याने भाज्या, फळे, अंडी, दही, पनीर, चीज ह्यांचा समावेश करा.

| Sakal

प्रवासात शरीरातली पाण्याची पातळी कमी होऊन डिहायड्रेशन होतं. त्यामुळं जास्त पाणी प्यावे. त्यामुळे तुम्ही जितके जास्त पाणी प्याल तितकीच सहलही सुखकारक होईल

| Sakal

प्रवासात शक्यतो घरूनच ३/४ दिवस टिकतील असे अन्नपदार्थ घेऊन निघावे. प्रवासात बाहेरचे अन्न आणि मांसाहार तर जरूर टाळावा.

| Sakal

प्रवासामुळे आपण थकतो, प्रवासात आपण जास्तीत जास्त वेळ बसलेल्या स्थितीत असतो. त्यामुळं पुर्ण झोप घ्यावी.

| Sakal

प्रवासा दरम्यान आपले हात वारंवार धुवून स्वतःचे रक्षण करा.

| Sakal

बर्‍याचदा जे लोक काहीही न खाऊन प्रवासाला जातात त्यांना जास्त त्रास होतो. रिकाम्या पोटी प्रवास म्हणजे ऍसिडिटी, थकवा, चक्कर येणे अशा आजारांना आमंत्रण!

| Sakal