चिला बनवण्यासाठी मूग दाळ, आले. मिर्ची, मीठ, काळे मिरे पावडर, स्वादानुसार कोथिंबीर, जीरे, तेल, उकळलेले वाटाणे, पनीर इत्यादी.
स्टेप १ - मूग दाळ २-३ तास पाण्यात भिजत ठेवा. भिजवल्यानंतर त्यातून पाणी काढून घ्या.
स्टेप २ - त्यात जीरे,हिरवी मिर्ची आणि आलं टाका. आणि त्याची स्मूथ पेस्ट बनवा. आता यात मीठ घाला.
स्टेप ३ - आता याचं डोस्यासारखं बॅटर बनवा. आता त्यात कोथिंबीर मिक्स करा.
स्टेप ४ - आता स्टफिंग तयार करा. यात आता उकळलेला वाटाणे, मीठ आणि काळ्या मिऱ्याची पूड मिक्स करा.
आता ताव्यावर थोडा तेल पसरा. आता चमच्याने ताव्यावर बॅटर सर्क्युलर मोशनमध्ये मिक्स करा. यादरम्यान गॅस मंद आचेवर ठेवा.
एका बाजूने चिला शिजला की आता चिला दुसऱ्या बाजूने पलटवून घ्या.
आता चिल्यामध्ये पनीचची स्टफिंग भरा. आणि त्याला रोल करून घ्या.
आता तुमचा चिला तयार आहे. प्लेटमध्ये सर्व्ह करुन चटनीसोबत खायला घ्या.