अभिनेत्री स्वरा भास्कर ही कायमच तिच्या पडद्यावरील धाडसी, प्रयोगशील कलाकृतीसाठी ओळखली जाते.
स्वराने अलीकडेच दिल्लीत राजकीय कार्यकर्ता फहा अहमदसोबत लग्नगाठ बांधली
लग्नानंतर लगेचच तिने आगामी चित्रपट ‘मिसेस फलानी’चे चित्रीकरण पूर्ण केले आहे.
‘मिसेस फलानी’ हा खरोखरच खूप खास चित्रपट आहे. असं स्वरा म्हणाली
‘मिसेस फलानी’ हा आठ वेगवेगळ्या पात्रांवर आधारित आहे.
स्वरा उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब यांसारख्या विविध राज्यांतील गृहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे.
चित्रपटाची निर्मिती ‘थ्री अँरोज’ आणि ‘सीता फिल्म्स’ यांनी केली आहे.
चाहते तिचे वेगवेगळे लुक बघायची वाट पाहत आहेत.