देशातील अर्थव्यवस्थेत औद्योगिक समूहांचे योगदान महत्त्वपूर्ण असते.
कंपन्यांचे शेअर्स वधारले की त्या त्या समूहांचे बाजारमूल्य कमी जास्त होत असते.
देशातील महत्त्वपूर्ण समूहांमध्ये २०२२ मध्ये अदानी समूहाने मोठी झेप घेतली.
टाटा समूहाचे बाजरमूल्य २१.१९ ट्रिलियन असून, २०२२ मध्ये कंपनीला ९.४ ट्रिलियची घट झाली आहे.
अंबानी समूहाचे बाजारमूल्य १७.५४ ट्रिलियन असून, कंपनीला गेल्यावर्षी ६.९ ट्रिलियनचा फायदा झाला आहे.
बजाज समूहाचे बाजारमूल्य ८.३५ ट्रिलियन असून, २०२२ मध्ये कंपनीला २.६ ट्रिलियनचा तोटा सहन करावा लागला आहे.
भारती समूहाचे बाजारमूल्य ५.१७ ट्रिलियन असून, गेल्या वर्षी कंपनीला १३.३ ट्रिलियनचा फायदा झाला आहे.
तर, अदानी समूहाचे बाजारमूल्य १९.६६ ट्रिलियन असून, २०२२ मध्ये वरील कंपन्यांच्या तुलनेत १०४.३ ट्रिलियनचा सर्वाधिक फायदा नोंदवला आहे.