इस्रोनं आज तीन छोट्या उपग्रहांसह SSLV-D2 रॉकेट लॉन्च केलं.
या रॉकेटची काही खास वैशिष्ट्ये आहेत.
'या' रॉकेटद्वारे अत्यंत कमी खर्चात उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत पाठवता येणार आहेत.
कमी खर्चामुळं भारतासह इतर देशांना आपले उपग्रह लॉन्च करणं सोयीचं होणार आहे.
आजच्या तिन्ही उपग्रहांना पृथ्वीच्या ४५० किमीच्या ऑर्बिटमध्ये स्थापित करण्यात आलं.
यांपैकी Janus-1 एका अमेरिकन कंपनीनं तर Azaadi SAT-2 चेन्नईच्या स्पेस स्टार्टअप कंपनीनं डेव्हलप केलं आहे.
तर तिसरा उपग्रह EOS-07 इस्त्रोनं बनवला आहे.