शुगर पेशंट किंवा डायबेटिक पेशंटची लक्षणे नेहमीच स्पष्ट नसतात.
अनेक वेळा मधुमेहाच्या लक्षणांमुळे तुम्हाला अस्वस्थ वाटत नाही. त्यामुळे हा आजार चटकन ओळखला जात नाही आणि निदानही होत नाही.
आज आपण मधुमेहाची सामान्य लक्षणं कोणती ते जाणून घेणार आहोत.
मधुमेह असेल तर तुम्हाला जेवन केल्यानंतर तुम्हाला थकवा जाणवतो विशेषत: दिवसा..
तुमची खाण्याची इच्छा आणखी वाढते, विशेषतः जेवण केल्यानंतर देखील काहीतरी खावेसे वाटते.
तुम्हाला वारंवार लघवीला जावे लागणे, विशेषत: रात्रीच्या वेळी.
असामान्य वाटावी इतक्या प्रमाण्यात तहान लागत असेल तर हे देखील मधुमेहाचे लक्षण असू शकते.
जर तुम्हाला अस्पष्ट दृष्टी, किंवा अंधुक दृष्टी यासारखं काही जाणवत असेल तर तुम्हाला मधुमेह असू शकतो.
जखमा हळूहळू बऱ्या होतात. जेव्हा तुम्हाला असे फोड दिसतात जे हळूहळू बरे होत आहेत तर ते कमी प्रतिकारशक्तीचे लक्षण असते.
त्वचा संक्रमण, अचानक वजन कमी होणे, वारंवार संसर्ग होणे हे देखील मधुमेहाचे लक्षण असू शकते.
हात किंवा पाय सुन्न होणे किंवा मुंग्या येणे.
जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका तर जवळच्या आरोग्य तज्ञांना भेट द्या आणि तुमच्या आरोग्याबाबत सल्ला घ्या.