आपण चेहऱ्याकडे जेवढे लक्ष देतो तेवढे मानेकडे देत नाही. त्यामुळे मानेवर काळा थर जमा होतो. अशा वेळी काय कराल ?
दह्यामध्ये हळद मिसळून मानेवर मालीश करा. थोडा वेळ तसेच राहू द्या आणि मग धुआ.
कोरफडीचा गर रात्रभर मानेवर लावून ठेवा.
काकडीच्या रसात लिंबू मिसळून कापसाने मानेवर लावा.
बेकींग सोडा मानेवर लावून ठेवा. थोड्या वेळाने ओल्या हाताने पुसा.
सफरचंदाच्या व्हिनेगरमध्ये पाणी मिसळून कापसाने मानेवर लावा.
कच्चा पपई किसून त्यात पाणी मिसळून मानेवर लावा.
लिंबाच्या रसामध्ये मध घालून मानेवर लावून ठेवा.