मैत्रीचे बंध दाखवणारे हे पाच मराठी चित्रपट बघाच..

| Sakal

१९८८ साली आलेल्या बनवाबनवी या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातला. आजही या चित्रपटाची जादू कमी झालेली नाही. या पाठोपाठ १९९० मध्ये आलेला 'धडाकेबाज' हा चित्रपट देखील असाच गाजला. या दोन्ही चित्रपटांमध्ये हास्य, विनोद यासोबतच निखळ मैत्रीचे दर्शन घडते.

| Sakal

अंकुश चौधरी, श्रेयस तळपदे, शर्वरी जेमनीस अशी तगडी स्टारकास्ट असलेला २००४ साली आलेला 'सावरखेड एक गाव' हा देखील मैत्रीचा प्रत्येय देणारा चित्रपट ठरला. गवार आलेलं संकट सोडवण्यासाठी मित्रांनी दाखवलेली एकजुट सर्वांनाच भावली.

| Sakal

केदार शिंदे दिग्दर्शित २००६ मध्ये आलेला तुफान विनोदी चित्रपट आजही प्रेक्षक विसरले नाहीत. भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, संजय खापरे, कुशल बद्रिके यांची मैत्री, पैसे कमावण्यासाठी केलेले आणि फासलेले प्लॅन आणि निखळ मनोरंजन देणारा हा चित्रपट होता.

| Sakal

चार मित्र सुट्ट्यांसाठी बाहेर जातात आणि तिथे आलेल्या चार मुलींच्या प्रेमात पडतात. प्रेमासोबत मैत्रीचे अनेक पदर उलगाडणाऱ्या या चित्रपटात सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमंत ढोमे, मनवा नाईक, पूजा सावंतमी सोनाली कुलकर्णी, कादंबरी कदम प्रमुख भूमिकेत होते.

| Sakal

‘दुनियादारी’ हा चित्रपट मराठी मनोरंजन विश्वातील एक उत्कृष्ट कलाकृती ठरला. 2013 मध्ये आलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना हसवले, रडवले आणि मैत्रीची जाणीव देखील करून दिली. स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, जितेंद्र जोशी, सुशांत शेलार, साई ताम्हणकर, उर्मिला कोठारे असे आघाडीचे कलाकार या चित्रपटात होते.

| Sakal

महाविद्यालयीन दिवसांच्या मैत्रीवर आधारित हा चित्रपट आहे. 2016 मध्ये आलेल्या या चित्रपटात, 20 वर्षांनंतर पुन्हा एकत्र जमलेले मित्र-मैत्रिणी, कॉलेजच्या दिवसांत घडलेल्या घटनांचा फ्लॅशबॅक, दोन गटांतील वैर आणि एक प्रेमकहाणी या चित्रपटात दाखवण्यात आली होती.

| Sakal