अनेकजण जुना फोन खरेदी करण्याला प्राधान्य देतात.
सेकंड हँड फोन खरेदी करताना काही गोष्टी नक्की पाहा, अन्यथा नुकसान होऊ शकते.
फोनच्या स्क्रीन, बॉडीवर स्क्रॅच तर नाही ना हे नक्की तपासा.
पोर्ट, माइक, स्पीकर सारखे डिव्हाइसचे पार्ट व्यवस्थित काम करतात की नाही हे पाहा.
बॅटरी फोनचा महत्त्वाचा भाग असते. फोन व्यवस्थित चार्ज होतो की नाही हे तपासा.
अनेकदा जुने फोन चोरीचे असतात. त्यामुळे खरेदी करताना विशेष खबरदारी घ्या.
फोनचे बिल घ्यायला विसरू नका.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे बिलवरील IMEI Number आणि फोनचा IMEI नंबर एकच आहे का पाहा.