डोळ्यांना अशाप्रकारे मेकअप केल्यास सौंदर्य अधिक खुलून दिसेल

नमिता धुरी

डोळ्यांचा मेकअप चांगला झाल्यास पूर्ण चेहऱ्याचे सौंदर्य खुलते. त्यामुळे डोळ्यांच्या मेकअपबाबत काळजी घेणे आवश्यक आहे.

डोळ्यांना क्रीम बेस्ड मेकअप केल्यास तो उठून दिसतो आणि जास्त काळ टिकतो.

तुमचे डोळे लहान असतील तर त्यांना मोठा आकार देण्यासाठी ग्रे, ब्राऊन, बेज रंगांच्या आयशॅडो लावा.

कंसीलरच्या वर मेकअप केल्यास तो उठून दिसेल.

रात्री एखाद्या पार्टीला जायचे असल्यास गडद रंगांचा मेकअप करू शकता.

पांढरे काजळ लावल्यास डोळे मोठे दिसतात.

पापण्यांच्या केसांना पावडर लावून त्यावर मस्करा लावा.

या टीप्स वापरून मेकअप केल्यास डोळे आकर्षक दिसतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.