शारीरिक आरोग्यासाठी अनेकजण ट्रेडमिलवर व्यायाम करतात. पण काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
हँडल जास्त वेळ वापरल्यास खांद्यांवर ताण येऊ शकतो.
ट्रेडमिलवर असताना समोर बघा. यामुळे तोल जाणार नाही.
चालत्या ट्रेडमिलवरून उतरू नका.
इन्क्लाइनचा वेग एकाएकी वाढवू नका. हळूहळू वाढवा.
योग्य आणि सोयीचे बूट घाला.
हँड्रील आणि कंसोल पकडल्यास तोल जाऊ शकतो.
ट्रेडमिलवर चढण्याआधी वॉर्म अप करा.