बँकिंग शिकवा : तुम्ही तुमच्या मुलांना ऑनलाइन बँकिंग, बँक खाते उघडण्यापासून ते क्रेडिट आणि डेबिट कार्ड सारख्या गोष्टींबद्दल माहिती द्या.
बजेट मॅनेजमेंट : मुलांना महिन्याच्या खर्चाचे बजेट बनवून बजेटनुसार पैसे द्या.
सेव्हिंगची सवय : रोज थोडे पैसे वाचवण्याचा सल्ला द्या. तसेच हे पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवण्याचा सल्लाही द्या.
क्रेडिट रेटिंगची माहिती : मुलांना सांगा की, चांगले क्रेडिट रेटिंग ठेवल्याने लोकांना कर्ज आणि क्रेडिट कार्ड मिळणे सोपे होते.
राखीव निधी ठेवा : मुलांना राखीव निधी आणि करीअरसाठी स्वतंत्र निधी तयार करण्यास सांगा.
आताच बचतीची सवय लावल्यावर मुलांच्या भविष्यात त्याचा खूप उपयोग होऊ शकतो.
बचतीच्या सवयींमुळे मुले आयुष्यातील अनेक आर्थिक आव्हानांना सामोरे जाऊ शकतात.