बऱ्याचदा आपल्याला समोरच्या व्यक्तीविषयी जे वाटत आहे ते खरंच प्रेम आहे की, आकर्षण हे समजत नाही.
जेव्हा आकर्षण असतं तेव्हा जोडीदाराला काय वाटतं यापेक्षा त्याने माझ्या पध्दतीने वागवं असा आग्रह धरला जातो. याउलट प्रेमात जोडीदारच्या आवडीनिवडीचा विचार आधी असतो.
जेव्हा समोरच्याविषयी फक्त आकर्षण वाटत असतं तेव्हा वाद झाल्यावर वाद मिटवण्यापेक्षा इगो मोठा असतो. आणि समोरच्या व्यक्तीच्या चुकाच दाखवल्या जातात.
जेव्हा प्रेम असतं तेव्हा इगो बाजूला ठेवून जोडीदारासोबतचे वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले जातात.
जर फक्त आकर्षण असेल तर जोडीदाराच्या भावनिक समस्यांविषयी फारसं घेणंदेणं नसतं. तेच प्रेमात जोडीदारला भाविक समस्येतून बाहेर कसं काढायचं हे तुम्हाला समजतं.
आकर्षणात जेडीदार सोडून जाईल का? या भीतीमुळे कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातो. तर प्रेमात एकमेकांना स्पेस दिली जाते.
प्रेमात आपल्या नात्यावर फार विश्वास असतो. कसाही प्रसंग आला तरी आपला जोडिदार सोबत आहे याचा विश्वास असतो.