मोठं घर पोकळ वासा, 'असे' आहेत चेंगट बॉलिवूडकर

| Sakal

बॉलीवूडचा 'शमशेरा' रणबीर कपूर तर महाकंजूस आहे हे त्याच्या लग्नाच्या वेळेस एका गोष्टीवरनं सिद्ध झाले, त्याचे शूज आलियाच्या मैत्रिणींनी लपवले होते आणि त्याच्याकडे ११ करोडची डिमांड केली होती. तेव्हा रणबीरनं आपल्या मेहूण्यांना १ लाख रुपये देत पिटाळलं होतं.

| Sakal

बॉलीवूडचा हंक जॉन अब्राहमच्या बाबतीतही कानावर पडतंय की तो कपडे खूपच कमी खरेदी करतो. महिन्याला तो फक्त दोन शर्ट,एक जीन्स अशीच खरेदी करणं पसंत करतो. ढिगभर कपडे एकावेळेस खरेदी करणं त्याला पसंत नाही.

| Sakal

सारा अली खानला देखील स्वतःवर उगाचच पैसे खर्च करायला आवडत नाहीत. तिची गाडी आजही फार काही महागडी नाही. तीला आपले कपडेही नेहमीच ब्रान्डेड घालायला आवडत नाही. कुठे फिरायला गेल्यावर अगदी रस्त्यावरचं देखील काही आवडलं तर ती खरेदी करते. साराच्या कंजुशीचा दाखला तर जान्हवी कपूरने सर्वांसमोर करणच्या चॅट शो मध्ये दिला होता. पैसे वाचावेत म्हणून सारानं हिमाचलमध्ये ती आणि जान्हवी फिरायला गेले असताना कमी बजेटचं हॉटेल निवडलं होतं.

| Sakal

बॉलीवूडची चुलबूली अभिनेत्री काजोल ही तर घासाघीस करुन खरेदी करते असं तिनं स्वतः तर सांगितलंच आहे पण तिचा नवरा अभिनेता अजय देवगणने कपिलच्या शो मध्ये थेट उदाहरण देऊनच सांगितलं आहे. काजोलला सेल मधून खरेदी करायला आवडते. ऑनलाईन शॉपिंगच्या तर ती सेल प्रकरणामुळेच प्रेमात पडली आहे. करण जोहरने तर तिला कंजूस हा टॅग बहाल केला आहे.

| Sakal

शाहरुख खान जवळ कशाची कमी नाही पण तरीही तो खूप विचारपूर्वक पैसे खर्च करतो असं मागे त्याचीच पत्नी गौरी खान एका मुलाखतीत म्हणाली होती. तो एक गोष्ट घेताना दहा ठिकाणी विचारपुस करतो आणि मग जिथे उगाचच पैसे जात नाहीत ना असं वाटेल तिथूनच ती गोष्ट खरेदी करतो असं देखील गौरी म्हणाली होती.

| Sakal

बॉलीवूडच्या दबंग खानजवळ खोऱ्यानं पैसा असेल पण असं असलं तरी तो खूपच कमी खर्च करतो. तो आजही आपल्या आई-वडीलांसोबत बान्द्रा येथे २ बी एच के फ्लॅटमध्ये राहतो. तर त्याच्याकडे खूप साधा फोन आहे,जो तो वापरतो.

| Sakal