साऊथच्या चित्रपटाचे चाहते असणाऱ्यांना त्रिशा कोण आहे हे काही नव्यानं सांगण्याची गरज नाही.
96 मध्ये त्रिशाच्या अभिनयाचे अनेकजण फॅन झाले आहेत. अनेकांची तर ती याच चित्रपटापासून आवडती अभिनेत्री झाली आहे.
त्रिशाचा सिम्पल लूक आता नेटकऱ्यांना भावताना दिसतो आहे. त्या फोटोंवर त्यांनी कमेंट करत तिचं कौतूक केलं आहे.
सोशल मीडियावर त्रिशाचा चाहतावर्ग मोठा आहे. तिला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.
त्रिशाचा साधा पण त्या मधाळ सौंदर्यानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्रिशा आता एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या पीएस सेल्वन या बिग बजेट चित्रपटांत त्रिशाचा वेगळा लूक दिसणार आहे.
यापूर्वी या चित्रपटातील व्हायरल झालेल्या तिच्या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली होती.
आता त्रिशानं तिचा वेगळा लूक शेयर करुन चाहत्यांना जिंकून घेतले आहे. त्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव झाला आहे.