Angarki Sankshati Chaturthi: हेल्दी आणि टेस्टी राजगिऱ्याच्या शिरा

| Sakal

उपवासाला खायचं काय करावं, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो.

| Sakal

आज आम्ही तुम्हाला हेल्दी आणि टेस्टी उपवासाची रेसिपी सांगणार आहोत.

| Sakal

उपवासासाठी राजगिऱ्याचा शिरा कसा करायचा हे आज आपण जाणून घेणार आहोत.

| Sakal

साहित्य : राजगिऱ्याचे पीठ, बारीक किसलेला गुळ, काजू-बदामाचे काप, साजूक तूप, वेलची पावडर, गरम पाणी

| Sakal

प्रथम कढईत तूप टाकून त्यात राजगिऱ्याचे चांगले खरपूस भाजून घ्यावे.

| Sakal

राजगिऱ्याचे पीठ चांगले भाजल्यावर त्यात काजू बदामाचे बारीक काप टाकून भाजून घ्यावे.

| Sakal

तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर बारीक किसलेला गुळ आणि त्यात पाणी टाकून गरम करायला ठेवावे

| Sakal

राजगिऱ्याचे पीठ चांगले खरपूस भाजले की मग त्यात गुळाच गरम पाणी चाळणीने गाळून टाकवे.

| Sakal

नंतर वेलचीपूड टाकून शिरा व्यवस्थित एकजीव करावा.

| Sakal

शिऱ्यातलं पाणी आटलं की थोडावेळ शिऱ्यावर झाकण ठेवावं. तुमचा टेस्टी शिरा तयार होणार.


| Sakal