त्वचेचे सौंदर्य खुलवणारे हळदीचे 'हे' खास फेसपॅक एकदा ट्राय कराच!

| Sakal

चमचाभर हळदीमध्ये पाणी, दूध किंवा दही घालून ओलसर पेस्ट बनवा. पेस्ट चेहऱ्याला लावून गोलाकार पद्धतीने हळुवार मसाज करा.

| Sakal

त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. त्यामुळे ब्लॅकहेड्स निघतील, त्वचा मऊ होईल आणि त्वचेचे पोर्स टाईट होतील.

| Sakal

चमचाभर मधात हळद आणि दूध घालून ओलसर पेस्ट बनवा. १०-१५ मिनिटे ठेवा. सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. त्यामुळे त्वचेचा पोट सुधारतो, सुरकुत्या कमी होतात. आणि त्वचेचा टोन समान होतो.

| Sakal

अंड्याच्या सफेद भागात चमचाभर हळद घाला. ऑलिव्ह ऑईल घालून पेस्ट बनवा. १०-१५ मिनिटे ठेवा. सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

| Sakal

या मास्कमुळे त्वचा उजळेल. त्वचेचा टोन सुधारेल. त्वचेत मॉईश्चर टिकून राहील आणि चेहऱ्यावर चमक येईल.

| Sakal

कोथिंबिरीच्या पानात दोन चमचे हळद घालून त्याची बारीक पेस्ट बनवा. चेहरा, नाक, हनुवटी, कपाळ यावर झोपण्यापूर्वी लावा. असे आठवड्यातून दोनदा केल्यास ब्लॅकहेड्सची समस्या कमी होईल.

| Sakal

२ चमचे चण्याच्या पिठात, अर्धा चमचा हळद आणि १ चमचा लिंबाचा रस घालून मऊसर पेस्ट बनवा. चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटे ठेऊन थंड पाण्याने चेहरा धुवा.

| Sakal

हा पॅक आठवड्यातून दोनदा लावा. हळद आणि चण्याच्या पिठामुळे त्वचा उजळते.

| Sakal