हिना खान ही टिव्ही इंडस्ट्रीमधील नामवंत अभिनेत्रींपैकी एक आहे.
ये रिश्ता क्या कहलाता है या प्रसिद्ध आणि नावाजलेल्या टिव्ही सिरीअलमधून हिना खानने आपल्या करीअरची सुरवात केली होती.
तिचं अक्षरा नावाचं पात्र खूप हिट ठरलं होतं.
त्यानंतर कसौटी जिंदगी की मध्येही ती नकारात्मक भूमिकेत दिसली.
याशिवाय ती बिगबॉस सीजन ११ मध्येही दिसली.
हिना खान सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते.
ती स्वत:चे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
नेटकरी तिच्या फोटोंवर नेहमी कौतुकाचा वर्षाव करत असतात.
हिना खान ही तिच्या बोल्ड अन् कुल लूक साठी खास ओळखली जाते.
हिना खान ला एअर होस्टेस व्हायचं होतं पण अॅक्सिडेंटली ती अभिनय क्षेत्रात उतरली.