व्हजायनल डिस्चार्ज ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून याचे वेगवेगळे प्रकार आहेत.
व्हजायनल डिस्चार्जमुळे योनिमार्ग स्वच्छ राहातो. याचे प्रमाण आणि रंग वयानुसार वेगवेगळा असतो.
गर्भधारणा, लैंगिक संबंध, गर्भनिरोधक गोळ्या यांमुळे डिस्चार्जचे प्रमाण कमी-जास्त होते.
पाळीच्या सुरूवातीला आणि शेवटी पांढरा, पातळ, चिकट स्राव जातो. त्याला दुर्गंध येत नाही.
गर्भधारणा किंवा लैंगिक संबंध या काळात पारदर्शक स्राव जातो.
पॅण्टीला चॉकलेटी डाग लागले असतील तर याचा अर्थ असा होतो की, पाळी सुरू होणार आहे किंवा येऊन गेली आहे.
हिरव्या आणि पिवळ्या डिस्चार्जचा संबंध हवेच्या संपर्कात येण्याशी असतो. पण तो घट्ट आणि दुर्गंधी झाल्यास डॉक्टरकडे जा.
डॉक्टर तुमच्या पाळीबाबातचे योग्य निदान करू शकतात.