गौतमीनं उदयनराजेंना दिला खास परफ्यूम; राजे म्हणाले, जाण नसणाऱ्या व्यक्तीकडं..

सकाळ डिजिटल टीम

गौतमीनं घेतली उदयनराजेंची भेट

नृत्यांगना गौतमी पाटीलनं सोमवारी भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली आहे.

सोशल मीडियावर चर्चांना उधाण

गौतमी पाटीलनं असं अचानक भेट घेतल्यानं सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलंय.

गौतमीकडून खास भेट

उदयनराजेंना भेटायला जाताना गौतमी पाटीलनं त्यांच्यासाठी खास भेट आणली होती.

उदयनराजेंना दिला परफ्यूम

गौतमीनं एका सहकाऱ्याच्या सल्ल्यावरून उदयनराजेंना त्यांचा आवडता परफ्यूम भेट दिला आहे.

गौतमी का भेटायला आली होती?

सोशल मीडियावरील या चर्चेनंतर उदयनराजे भोसले यांनी गौतमी पाटील का भेटायला आली होती? याचं उत्तर दिलं आहे.

उदयनराजेंच्या उत्तराने पिकला हशा

साताऱ्यात एका पत्रकारानं विचारलं की, तुम्हाला गौतमी पाटील भेटायला का आली होती? यावर उदयनराजेंनी हसत उत्तर दिलं. तुमच्या चेहऱ्यावर स्माईल का आहे? उदयनराजेंच्या या उत्तरानंतर एकच हशा पिकला.

गौतमी पाटील ह्या एक कलाकार

उदयनराजे पुढं म्हणाले, 'गौतमी पाटील ह्या एक कलाकार आहेत. जो कलेची दाद देतो, त्यांच्याकडेच त्या (गौतमी पाटील) जाणार ना… कलेची जाण नसणाऱ्या व्यक्तीकडं त्या का जातील?'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Udayanraje Bhosale